टी . व्ही  पाहण्या ची वेळ म्हणजे सगळे कुटुंब एक्तत्र हॉल मध्ये असण्याची वेळ होय  ! एकदा असेच एक मालिका बघत असताना माझ्या पाच वर्षया च्या मुलीने टी . व्ही  वरील शोषित आणि अबला नाईकेला बघून विचारला ” तुला पण आज्जी अस करते ?”

 

त्या वेळी घरातील सगळे मंडळी माझ्या उत्तराची वाट बघत होते आणि माझ्या कावर्या  बावर्या चेहर्या कडे बघून हास्याचे फवारे सुटले.  आमच्या घरात तसे खेळीमेळीचे वातावरण असल्यामुळे माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलीची समजूत काढली व तिला पटवून दिले कि मालिकांमधील हि पात्रे  खोटी असतात पण ह्या प्रसंगानंतर माझ्या लक्षात आले कि ह्या मालिका  मनोरंजनापलीकडे पण बरच काही देऊ शकतात . एका पाच वर्षाच्या मुलीला ते विचार करायला लावू शकतात, प्रेरणा देऊ शकतात आणि तिच्या चिमुरड्या मनावर खोल कुठेतरी कायमचे ठसे उमटवू शकतात.

 

मोठे होत असताना छोट्या पडद्या वरील  धडाडीच्या आणि कर्तृत्ववान स्री पात्रांची आठवण होताच माझ्या लक्षात आले कि वादळवाट मधील रमा चौधरी, किव्हा  दामिनी असो, कि आभाळमाया मधील सुधा, ह्या स्री भूमिकांनी माझ्या मनावर कुठेतरी एक छाप सोडली.

 

हे लक्षात येताच आम्ही कुठले कार्यक्रम बघतोय ह्याची आम्ही स्वताहाऊन उजळणी केली आणि ज्या मालिकांमध्ये नाइकेला स्वतःच अस्तित्व आणि विचार नसतील असे कार्यक्रम बघणे बंद करून टाकले.

 

सध्याच्या काळात परत अश्या विविध  विचारांच्या आणि स्वतःच असं अस्तित्व असणाऱ्या भूमिका छोट्या पडद्यावर पाहायला मिळतायत , त्यातील मला आवडलेल्या आणि आमच्या कुटुंबाच्या मनाला भावलेल्या काही निवडक भूमिका म्हणजे

 

हिरा 

बाजी हि मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजते आहे. फक्त १०० भागात आटोपणारी हि मालिका जरी काल्पनिक असली तरी त्यातील व्यक्तिरेखा अगदी रूपक आणि अविस्मरणीय आहेत. पेशवे कालीन पुणे , येथे घडलेल्या घटना आणि स्वराज्याचा अभिमान असलेली प्रजा याचे सुंदर रेखाटन ह्या मालिकेत केले आहे.  बाजी ह्या पेशवे काळीन मालिका मध्ये दिसणारे एक पात्र म्हणजे हिरा.

Heera from Baaji on Z Marathi

 

हे  पात्र सध्या माझ्या मुलीचे लाडके पात्र आहे. सुंदर, लावण्यवती अशी हिरा  वेळ पडल्यास दहा जणांना पुरून उरेल अशी वाघीण आहे. बाजी ची प्रेयसी असली तरी ती आधी स्वराज्य रक्षक आहे. सुंदर आणि धडाडीची हिरा शस्त्र  हि चालवते आणि माया हि करते. तिचि स्वराज्यरक्षणाची पुढची वाटचाल आम्ही सगळेच आवर्जून बघत आहोत.

 

रमाबाई रानडे

 

रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर आधारित हि मालिका आमच्या घरात सगळ्यांनाच भावली. स्री शिक्षण , त्याचे  महत्त्व आणि एका बाईच्या जिद्दीची हि कहाणी बरच काही शिकवून गेली. छोटी रमा हे  माझ्या मुलीचे आवडते  पात्र आणि तिच्या परिश्रमांना पाहून माझी मुलगी नुसती जागृकच न्हवे तर प्रयत्नशील झाली.

 

मानसी

 

एक डॉक्टर आणि सिंगल mother. समाजाच्या चौकटी बाहेर जाऊन एका मुलीला मानसी वाढवते आणि घरातील आणि घरा बाहेरील जवाबदाऱ्या चोख पार पाडते.  आपल्या बहिणीच्या मुलीला एक प्रेमळ घर आणि आई देणे हेच ती आपल्या आयुष्याचे ध्येय बनवते. आपल्या मनाला पटेल ते निर्णय घेऊन ते निभावून न्हेणारी आजची स्री म्हणजेच मानसी.

manasi from khulata kali khulena

 

श्रेया बुगडे

 

श्रेया हिला आपण चला हवा येऊ द्या मध्ये नेहमीच बघतो. ती लोकांना हसवते, पण तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखे मध्ये एक सबळ नायिका असते. श्रेया खऱ्या अर्थांनी  दाखवून देते आहे कि एका मुलीला कुठलेही काम अवघड नाही.

 

अस्मिता

खूप वर्षांनी छोट्या पडद्यावर एक गुप्तहेराची भूमिका बघायला मिळाली. ते सुद्धा एक स्री पात्र असल्यानी ते आम्हाला जास्त भावले . हुशार, धडाडीची आणि वेळ प्रसंगी गुन्हेगारांशी दोन हात करणारी अस्मिता एक मनोरंजनकारी आणि रोमांचकारी पात्र होते

 

अश्या ह्या सुंदर व्यक्तिरेखा बघून मला आनंद होतो कि रोज आम्ही फक्त मनोरंजक  न्हवे तर काहीतरी वैचारिक सुद्धा पाहतो. मला खात्री आहे कि बाजी मधील हिरा पाहून माझ्या मुलीला हे कळेल कि सुंदर म्हणजे अबला किव्हा लाचार न्हवे तर अस्मिता सारख्या व्यक्तिरेखांमुळे तिला समजेल कि बऱ्याचदा शक्ती ला युक्ती नि मात देता येते. श्रेया बुगडे ला पाहून हे पटते कि मनात ठरवले तर पुरुष प्रधान कार्यक्रमात सुद्धा स्वतःची अशी एक वेगळी ओळख उभारता येते. आणि रमाबाई सारख्या थोर व्यक्तींचे आयुष्य पाहून आपले स्वातंत्र्य आणि शिक्षण किती कष्टानी मिळाले आहे ह्याची जाणीव होते. हिरा आणि अश्या भरपूर नवीन पात्रांनी मराठी मालिका प्रबळ आणि प्रेरणादायी होवो हीच सदईच्छा

झी मराठी वाहिनी ह्या सगळ्या पात्रांना रोज  आपल्या घरी घेऊन येते. ह्या वाहिनी च्या आपल्या लाडक्या पात्रांना आता तुम्ही सोसिएल  मीडिया वरही भेटू शकता

 

https://www.facebook.com/zeemarathiofficial

https://www.instagram.com/zeemarathiofficial/

29 Replies to “लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका मधील धडाडीच्या स्री व्यक्तिरेखा #BaajiOnZeeMarathi”

 1. मालिकांमधल्या महिला व्यक्तीरेखा आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया यांची नकळत का होईना आपल्या मनात होणारी तुलना आणि तुम्ही मांडलेल्या व्यक्तिरेखांचे पैलू छान आहेत…

 2. You are right Neha, strong female characters in television soaps are extremely inspirational for woman normally confined to the four walls of the household mostly and yes I too am in awe of Hira in Baaji.

 3. टीव्ही मालिकांमध्ये जुन्या काळातील स्त्रियांची भूमिका साकारणे हे तसे पहिले तर आव्हानात्मक काम आहे. मराठी मालिकांमध्येही जुन्या स्त्री व्यक्तिरेखांची भूमिका अनेक नायिकांनी अत्यंत उत्कृष्टपणे साकारली आहे.
  #BaajiOnZeeMarathi

 4. Content based tele series is something we keep looking for, but over few decades Indian daily TV Sops were limited to Saas-Bahu melodrama. Glad that this series talks about strong-headed woman who live life on their own terms.

 5. I have always loved the Marathi literature and Marathi media for being sensitive to womencentric issues. They have really shown the way for strong women characters on television , hopefully others will follow suite .

 6. Daily soaps should focus more on female characters. Such female-centric characters inspire us, encourage us. Women are strong enough – we should start believing this.

 7. In daily soaps women should be showed strong and independent not always in kitchen as it is the need of the hour and daily soaps are the medium to reach a large amount of people

 8. This is great that in Indian cinema women is shown so strong and perfect way ..actually the way every women is this world STRONG !!

 9. Though it be movies or daily soaps I have always had a soft corner for the ones that had a strong woman character in it. I guess it makes me feel empowered by just looking at the way they perform 🙂

 10. TV soaps have good reach and they can influence a good chunk of the people across the globe. Regional language is ideal for better reach. Such daily soaps influence and encourage the women and will help them to change their typical thought process.

 11. I really like TV shows that depict the strength a woman has. Society needs to accept the growth of women in status and to the equal of men.

 12. I really appreciate the fact that TV serials are getting better with time. I stopped watching television only because of too much drama and politics which only leads to negative thoughts in minds. Good that women are being featured as beauty with brains and they can achieve anything with their best qualities

 13. Mazhya ghari Zee Marathi staple food ahe. Amhi repeat Cha pan repeat baghat asto. I believe Zee even before it became Zee has come up with great content and has portrayed strong women. Currently mazhi fav Tula Pahate Re ahe.

 14. Marathi Sahitya is very deep rooted and whenever it has been shown through different serial, it leave an impression on viewer’s mind. I am highly impressed with Unch Majha Zhoka and the way Spruha Joshi has lived the character of Rama Bai Ranade. Exceptional.
  Thanks Neha for giving me thins wonderful chance of reading your Marathi writing. Loved it. Please write more in Marathi.
  #Myfriendalexa #MothersGurukulreads

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.